औरंगाबाद: आज अक्षयतृतीयेनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते, परंतु असे असले तरी वाहन खरेदी, सोना खरेदीवर मात्र दुष्काळाचे सावट दिसून आले. आंबे देखील मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली.वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीया तिथीला ङ्गअक्षय तिथीफ म्हटले जाते. प्रत्येक शुभकार्य सुरू करण्याचा दिवस म्हणून आजचा दिवस मानला जातो. अक्षयतृतीयेला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे या दिवशी सोने खरेदीला अत्यंत महत्त्व दिले जाते. याशिवाय नवनी वस्तूंच्या खरेदीलाही अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यानुसार आज अनेकांनी सोनेखरेदीला महत्त्व दिले. परंतु त्यातच दुष्काळाचे सावट असल्याने सोने खरेदी जेमतेम राहिली. तसेच वाहनखरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यावर्षी दुष्काळामुळे वाहनखरेदीत प्रचंड घट झाली.
आंबे खरेदी मात्र वाढली !
अक्षयतृतीयेनिमित्त कर्नाटक, आंध्रप्रदेश, देवगड, केरळ, नागपूर येथून आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे आंब्याच्या किंमतीत फारसी वाढ झाली नाही. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल,याच दरात आंबे विक्री करण्यात आली. सकाळपासूनच आंबे खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आंब्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यामुळे आंबे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.